August 9, 2025

श्रमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीने प्रशिक्षण शिबीराचा समारोप

  • कळंब – कळंब येथे दि.१८ डिसेंबर रोजी मुंडे कॉम्प्लेक्स मध्ये ॲक्शन एँड संस्था दिल्ली व श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने ३०० चेतक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येऊन त्याचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. दि.११ व १८ डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जमिन अधिकार आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर यांनी गायरान जमीन गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.तर
    पश्चिम महाराष्ट्र येथील दलित चळवळीचे नेते ललित बाबर यांनी दलित समाजातील प्रश्नांवर मार्गदर्शन केले. या वेळी लहुजी शक्ती सेनेचे बालाजी गायकवाड, धाराशिव योद्धाचे पत्रकार हनुमंत भाऊ पाटुळे, जिल्हा अतिरिक्त न्यायालयाचे ॲडव्होकेट एस, आर,आगलावे, मानवी हक्क अभियान च्या जिल्हाध्यक्षा माया शिंदे यांनी या चेतक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना मध्ये पोलीस, निवासी अतिक्रमण, वन गायरान, अतिक्रमण, ॲट्रॉसिटी ॲक्ट, महिला के साथ हिंसा के खिलाफ, हवामान बदल व त्याचा परिणाम, शासकीय योजना, आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी कळंब तालुक्यातील मोहा ,नागुलगाव, मस्सा (खं),शिराढोण,नायगाव, येरमाळा,पानगाव,मंगरूळ, अडसूळवाडी,रांजणी, शिराढोण,गौरगाव,वडगाव (सि),बाभळगाव,जवळा, सोनेगाव,विझोरा,कन्हेरी,या ठिकाणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले होते.गायरान जमिन नावे होईपर्यंत लढा चालूच ठेवणार असे बजरंग ताटे यांनी समारोप कार्यक्रमात बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार हनुमंत भाऊ पाटुळे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे यांनी केले. या वेळी अमर ताटे, वैभव ताटे, अशोक कसबे ,प्रथमेश गायकवाड, अशोक गायकवाड, बापु खंडागळे दादाराव कांबळे,
    सुनील गायकवाड,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!