August 9, 2025

संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन

  • कळंब (परमेश्वर खडबडे यांजकडून ) – येथे ज्ञानदा बहुउद्देशीय मंडळ व संत गाडगेबाबा सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज यांची 67 वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. संत गाडगे महाराज यांच्या प्रतिभेचे पूजन व पुष्पहार अर्पण काँग्रेसच (आय) तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,ज्ञानदा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष बंडू आबा ताटे ,संत गाडगेबाबा सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ जाधव ,ओबीसी संघटनेचे दीपक जाधव महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राज्य संघटक संजय वाघमारे ,निलेश शिंदे ,विशाल राक्षे ,बाळासाहेब यादव, अशोक भाग्यवंत ,निलेश पांचाळ ,पांडुरंग लोहकरे ,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत ,सतीश तवले यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!