लातूर – दि १७ डिसेंबर २०२३ रोजी बुद्ध गार्डन, कॉईल नगर येथे (७ वि बटालियन )द महार रेजिमेंट चा ६५ वा स्थापना दिवस अतिशय हर्ष उल्लासात व आंनदी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून लातूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमेय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच ७ वि बटालियन चे तसेच बाकी द महार रेजिमेंट चे सर्व जवान व अधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी ७ वी महार बटालियन द महार रेजिमेंट च्या स्थापना दिवस निमित्त सर्व शाहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली तथा द महार रेजिमेंट गीत गाण्यात आले या वेळी केक सुद्धा कट करण्यात आला.
अनेक युद्धात ७ महार बटालियन द महार रेजिमेंट चा युद्धात थेट सहभाग व महत्व तसेच युद्धातील सर्व समावेशक संपूर्ण कामगिरी व देशासाठी अतूट बलिदान या बद्दल कॅप्टन माधव कांबळे यांनी विषयी अत्यंत सविस्तरपणे माहिती दिली.या वेळी मुख्य अतिथी यांनीही ७ वी महार बटालियन द महार रेजिमेंट बद्दल गौरवोउद्गार काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण जिल्हा पोलीस अधीक्षक सोमेय मुंडे यांच्या हस्ते झाले, तदनंतर सर्व उपस्थितांना भंतेजी बुद्धशील यांनी त्रिसरण पंचशील दिले, या वेळी विचार मंचावरील सर्व मान्यवर व महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी माजी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करडखेडकर साहेब, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीचे उदय सोनवणे, मिलिंद धावारे, अन्तेश्वर थोटे, शकुंतला नेत्रगावकर यांनी सुद्धा आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन मच्छिंद्र कांबळे, कॅप्टन दत्ता गायकवाड, सुभेदार रवी कांबळे, सुभेदार राजेंद्र साबळे,सुभेदार दिगंबर कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, हवालदार बालाजी कांबळे, व सेवारत व सेवानिवृत्त सैनिक ५३ द महार बटालियन,आदिनी प्रयत्न केले तथा या वेळी एन. सि. सि. चे सर्व पदाधिकारी, रत्नदीप कांबळे, माजी नगरअध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीचे सर्व सदस्य व मोठया प्रमाणात जण समुदाय उपस्थित होता, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार कॅप्टन माधव कांबळे यांनी मानले,कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगानाने झाला.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी