कळंब – कळंब तालुक्यातील रांजणी- येथील नॅचरल शुगर मध्ये नवनवीन प्रकल्प उभारणीचा सपाटा सुरू असून २०२२ मध्ये नॅचरल शुगरने बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हाती घेवून पूर्ण करून प्रत्यक्ष उत्पादनास सुरूवात केली.बायो सीएनजी ची विक्रीही लातूर शहरामध्ये सुरू आहे.परंतु आज नॅचरल शुगरने स्वतःचा स्वतंत्र पंप उभारणी करून त्याचे आज फीत कापून जनतेच्या सेवेत सीएनजीचा पंप 24 तास सुरू राहणारा एकमेव पंप लोकार्पीत करत असल्याचे नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले. पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की, 2022 मध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले असतानाही त्यावर मात करून भविष्यातील भारताच्या प्रदुषनमुक्त इंधनाची गरज लक्षात घेवून आणि साखर कारखान्यामध्ये उत्पादीत टाकावू पदार्था पासून इंधन निर्मिती करण्याचा संकल्प हाती घेवून सीएनजी प्रकल्पाची उभारणी पूर्ण करून ‘नॅचरल बायो सीएनजी’ ग्राहकांना उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.नॅचरल सीएनजी प्रकल्पा मुळे उत्पादीत होणा-या पर्यावरन पूरक इंधनामुळे देशाचे परकीय चलनही कांही प्रमाणात वाचेल आणि वाहनांच्या वापरा मुळे होणा-या प्रदुषनासही आळा बसण्यास मदत होईल असे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले. नॅचरल शुगर कारखाना साईटवर बायो सीएनजी ग्राहकांना उपलब्ध व्हावा यादृष्टीने नवीन बायो सीएनजी पंपाचे भूमीपूजन मागील दीड वर्षा पूर्वी केले होते परंतु शासकीय सर्व मान्यता घेण्यास खुप मोठा वेळ वाया गेला परंतु सर्व शासकीय मान्यता घेवून आज सर्व जनतेच्या सेवेत नॅचरल शुगरने सीएनजी पंप सुरू केला असून त्याचा कमीत कमी दर रू.80/- प्रतिकिलो ठेवलेला आहे जो ईतरांपेक्षा सर्वात कमी दर आहे. तरी या संधीचा जास्तीत जास्त शेतक-यांनी फायदा घेवून त्यांचे ट्रॅक्टरसाठी वापर करावा आणि इंधन खर्चामध्ये मोठी बचत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. बायो सीएनजी पंपाचे शुभारंभाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष कनामे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रवर्तक दिलीपराव भिसे यांनी मानले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद शेतकरी, कर्मचारी, पतसंस्था व मल्टीस्टेटचे कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात