कळंब – जयंती लोकनेत्याची- सन्मान गुणवंतांचा उपक्रमाअंतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती उत्सव समिती कळंब च्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून क्रिडा क्षेत्रात कळंब शहराचे नाव लौकीक करणार्या रग्बी राष्ट्रीय खेळाडू, आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्क्वॉश विजेते 21 खेळाडू व शहरातील उत्कृष्ट 7 क्रिडा शिक्षक प्राचार्य साजिद चाऊस,लक्ष्मण मोहिते,प्रा.सरस्वती बोंदर, अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, प्रदिप रोटे, दत्ता ढोले यांचा सन्मान करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदरील कार्यक्रम शहरातील क्रीडा मार्गदर्शक कवी प्रा.डाॅ.बाळकृष्ण भवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रमुख पाहुणे हभप महादेव आडसुळ महाराज, प्राचार्य साजेद चाऊस, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे , पाटील, राजेंद्र बिक्कड,मुख्याध्यापक गौतम जाधवर ,प्रा.सरस्वती बोंदर, डॉ.भगवंत जाधवर, बाबासाहेब सारुक,विठ्ठल माने, दिलीप डोईफोडे उपस्थित होते.या प्रसंगी प्रा.बाळकृष्ण भवर यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.हभप महादेव महाराज आडसुळ यांनी क्रिडा क्षेत्रातील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी खेळाचे महत्त्व विशद केले.विठ्ठल माने यांनी जीवनात खिलाडु वृत्तीचे महत्व सांगितले.या निमित्ताने जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी सचिन (पिनु) जाधवर व सचिव पदी प्रा.सचिन बोंदर यांची निवड जाहीर केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सुत्रसंचलन महादेव खराटे, आभारप्रदर्शन बाबासाहेब सारुक यांनी केले. याप्रसंगी प्रकाश पाळवदे, अशोक बिक्कड , निशिकांत आडसुळ, विष्णु पाळवदे, मुकुंद नांगरे, हरिभाऊ मोरे, प्रभाकर बोंदर,अनिल जाधवर प्रविण तांबडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात