April 24, 2026

रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान

  • धाराशिव (साक्षी पावन वृत्तसेवा) – रोटरी क्लब धाराशिव यांच्या वतीने वार्षिक आढावा आणि वोकेशनल अवॉर्ड गुणगौरव कार्यक्रम मंगळवार,दि. २१ एप्रिल २०२६ रोजी जे.एफ.अजमेरा नेत्र रुग्णालय,धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
    या कार्यक्रमास रोटरीचे जिल्हा गव्हर्नर सुधीर लातूरे,सहाय्यक गव्हर्नर डॉ.गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष रणजीत रणदिवे व सचिव प्रदीप खामकर यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
    यावेळी ग्रामीण वुमन ट्रस्ट,धाराशिवच्या माध्यमातून महिलांसाठी डिजिटल साक्षरता,मुलींचे शिक्षण,जीवन कौशल्य विकास,उपजीविका निर्मिती,महिला सक्षमीकरण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीद्वारे महिलांच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग घोडके यांना रोटरी क्लब धाराशिवच्या वतीने “वोकेशनल अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी घोडके यांच्यासह त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
    गेल्या ३६ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या रोटरी क्लब धाराशिवच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे,अवघ्या १० महिन्यांत ७५ यशस्वी प्रकल्प राबविण्याची कामगिरी करणारे अध्यक्ष रणजीत रणदिवे व सचिव प्रदीप खामकर यांचे उपस्थितांनी कौतुक केले.
    सन्मान स्विकारताना पांडुरंग घोडके यांनी रोटरी क्लब धाराशिवच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत,भविष्यातही सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
error: Content is protected !!