कळंब–शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कार्यरत असलेल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को. ऑप.क्रे.सो.ली.मोहा या संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे,हसतमुख व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले आदरणीय फुलचंद (अण्णा) मडके यांचा वाढदिवस विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,अभ्यासू व दूरदृष्टी असलेल्या शिक्षकवृत्तीच्या व्यक्तिमत्वांसह चेअरमन हनुमंत मडके यांच्या नेतृत्वात फुलचंद (अण्णा) मडके यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे संस्थेची शैक्षणिक व सामाजिक वाटचाल अधिक सक्षम झाली आहे. याच कार्याची दखल घेत कळंब शहरातून बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’ परिवाराच्या वतीने फुलचंद (अण्णा) मडके यांना वाढदिवसानिमित्त विशेष अंक भेट देऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी ॲड.व्ही.के.माने,अंगद कापसे,संजय मुंडे,संस्थेचे हेड ऑफिसचे कायदेशीर व वसुली विभाग प्रमुख राहुल मडके,कळंब शाखा व्यवस्थापक रोहिणी कवडे,क्लार्क गणेश पवार,साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी अण्णा मडके यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फुलचंद (अण्णा) मडके यांचे कार्य हे केवळ संस्थेपुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपत बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे.
More Stories
अमन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा स्पर्धेत धाराशिवचा ऐतिहासिक विजय;दमदार फलंदाजी-गोलंदाजीच्या जोरावर नांदेडवर मात
अल्प पेन्शनवाढीसाठी EPS-95 सेवानिवृत्तांचा आवाज बुलंद; केंद्रीय श्रम मंत्र्यांना निवेदन