धाराशिव (जिमाका) – दि.11 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती अभियानाच्या एलईडी वाहनास हिरवा झेंडा दाखूवन जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे आदी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या पारदर्शकतेबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच मतदानामध्ये मतदारांची टक्केवारी वाढविण्याच्या अनुषंगाने गावोगावी जाऊन 20 जानेवारी 2023 पर्यंत एलईडी वाहनाद्वारे हे अभियान राबविले जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रत्येक गावी जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या तज्ज्ञांद्वारे ही जनजागृती करुन मतदारांचे प्रश्न व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.अशी माहिती याप्रसंगी धाराशिवचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी यावेळी दिली.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी