( हॉटेल श्रीकृष्ण येथे सामाजिक कार्यकर्ता बाजीराव,पत्रकार अविनाश,शेतकरी मारोती दादा आणि बांधकाम मिस्त्री सुधाकर यांच्यात पर्याय संस्थेवर चर्चा सुरू असते .)
मारोती – राम राम..! कार्यकर्ते..! सकाळी महाराजांच्या पुतळयाजवळ लंय लोक घोषणा देत होती… काय भानगड होती?
बाजीराव – अहो दादा..! भानगड वगैरे काही नव्हती. पर्याय संस्थेचे विश्वनाथ आण्णा तोडकर माहित आहेत का? त्यांनी महाराष्ट्रातील कर्तुत्वान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आज जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त महिला,विश्वनाथ अण्णा,भूमीपुत्र वाघ,सुभाष घोडके,माधवसिंग राजपूत,एम.एन.कोंढाळकर, मंगलाताई दैठणकर,रमाकांत कुलकर्णी,मनीषा घुले आदींनी पुरस्कार वितरणाच्या अगोदर म्हणजे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सुधाकर – विश्वनाथ अण्णांनी निराधार महिलांना पर्याय संस्थेच्या माध्यमातून खूप मोठा आधार दिला आहे.आमच्या गल्लीतील माता रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाला शेळ्या व म्हशीसाठी अनिक फायन्संस मधून कर्ज पुरवठा केला आहे. गटातील प्रत्येक निराधार महिलांना दुग्ध व्यवसायाचा पर्याय दिला आहे.
अविनाश -अहो नुसते बचत गटाच्याच महिलाना नाही तर परित्यक्ता,एकल,विधवा अशा विविध प्रकारच्या माहिलासाठी विश्वनाथ अण्णांनी घरे सुद्धा बांधून दिली आहेत. कित्येकांना त्यांच्या संस्थेत कार्यकर्ती म्हणून सुद्धा नोकरी दिली आहे. माझ्या माहितीनुसार किमान दहा हजार महिलांना अण्णांनी रोजगार देऊन त्यांना सक्षम केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचारा विरोधात सुद्धा न्याय मिळवून दिला आहे. गायरानधारकासाठी सुद्धा शासनाबरोबर निकराची लढाई लढत आहेत. त्यांच्या संस्थेत एकदा गेले की, त्या महिलांना आधार मिळालाच हे मात्र नक्की..!
मारोती – विश्वनाथ अण्णा मंजी देव माणूसंच म्हणायच की, अशी परोपकारी आणि निराधारांच्या मदतीला धावून जाणारी माणसं सध्याच्या काळात सापडणे मुश्कील हाय बघा कार्यकर्ते. त्या देवमाणसाचे मला दर्शन घ्यायचे हाय..! त्यांच्याकडे मला घेऊन चला लंय उपकार होतील..!
बाजीराव – अहो दादा..! विश्वनाथ अण्णांची व तुमची भेट घालून द्यायची विनंती तुम्ही करत आहात. यात कशाचे उपकार..! बसं का.. मला पण तुम्ही समजून घेतले नाही याची खंत वाटतेय..! चला…बसा..! गाडीवर घेऊन जातो.
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड