कळंब – तालुक्यातील मंगरूळ येथे श्री.पंचमुखी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य तीन दिवसीय यात्रा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि.१ एप्रिल २०२६ पासून या धार्मिक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे.गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री. पंचमुखी हनुमान मूर्तीचा महारुद्राभिषेक मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे.तसेच हनुमान आरती आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार असून सायंकाळी ७ वाजता हनुमान मूर्तीची भव्य नगर प्रदर्शना काढण्यात येणार आहे.या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दि.२ एप्रिल रोजी पहाटे ५१ भक्तांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात येणार आहे.सकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता बाळराजे आवरे पाटील यांच्या हस्ते महारुद्राभिषेक पार पडणार आहे. यानंतर हनुमान आरती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते होईल. दुपारी २ ते ६ या वेळेत प्रसिद्ध भारुडकार कृष्णा महाराज जोगदंड यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार असून रात्री ८ वाजता देविदास महाराज निवळीकर यांचे कीर्तन रंगणार आहे.या कार्यक्रमाला डॉ.प्रतापसिंह पाटील,नेते सुधीर पाटील,सुरेश पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी ११ वाजता महाआरती आयोजित करण्यात आली असून जिल्हा परिषद सदस्य जयवंत कुंभार,अनंत लंगडे,अजित लाकाळ, प्रदीप शिंदे, संजय लोखंडे व अमोल भोरे यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ८ वाजता महाआरतीनंतर जालना येथील शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा शाहिरी जलसा रंगणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेना जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे तसेच कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते होणार आहे. या तीन दिवसीय उत्सवामुळे मंगरूळ गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
More Stories
“महिलांच्या नेतृत्वात साजरी होणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”;कळंब आगारात जयंती समितीची घोषणा
“प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देणारच!” – नगराध्यक्षा सुनंदा कापसे
कळंबमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मध्यवर्ती समितीची घोषणा;सुमित रणदिवे अध्यक्षपदी निवड