कळंब– विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कळंब शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी मध्यवर्ती समितीची घोषणा करण्यात आली आहे. दि.३१ मार्च २०२६ रोजी मंगळवारी विश्वरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती,पुतळा परिसर, कळंबच्या अध्यक्षपदी सुमित रणदिवे यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी शिवाजी शिरसाट,कोषाध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड,सचिवपदी मुकेश गायकवाड तर प्रसिद्धीप्रमुखपदी अविनाश घोडके यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय माणिक गायकवाड, महादेव धीरे,रमेश भोसले,मोहन गायकवाड,सागर पटेकर,सुरज गायकवाड,शहाजी शिरसाट, नामदेव गायकवाड,किशोर मगर, निलेश गवळी,सुरज रणदिवे, निखील कांबळे,शुभम गायकवाड,गौतम शिरसाट, सुशील गायकवाड आदी सदस्यांचीही कार्यकारिणीत निवड करण्यात आली. बैठकीत यंदाच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.यात नामवंत वक्त्यांची व्याख्यानमाला, समाजप्रबोधनपर गीत गायन कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज स्पर्धा यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कळंब शहरात मोठ्या उत्साहात व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
“महिलांच्या नेतृत्वात साजरी होणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”;कळंब आगारात जयंती समितीची घोषणा
“प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देणारच!” – नगराध्यक्षा सुनंदा कापसे
मंगरूळमध्ये हनुमान जन्मोत्सवाची धूम;तीन दिवसीय यात्रेत रुद्राभिषेक,भारुड आणि शाहिरी जलसा रंगणार!