March 21, 2026

साक्षी पावनज्योत परिवाराकडून आगार व्यवस्थापक विजय घोलप यांचा मानाचा सत्कार

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’ परिवाराच्या वतीने कळंब आगाराचे नवनिर्वाचित आगार व्यवस्थापक विजय घोलप यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
    या प्रसंगी ‘साक्षी पावनज्योत’चा अंक आणि पुष्पहार अर्पण करून तसेच पेढे चारून घोलप यांचा यथोचित गौरव करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात आगाराच्या प्रगतीसाठी भरीव योगदान मिळेल,असा विश्वास व्यक्त केला.
    कार्यक्रमास साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’चे कार्यकारी संपादक अविनाश घोडके,पत्रकार अमर चोंदे,विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले,व्यावसायिक लक्ष्मण घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच आगारातील इतर कर्मचारीही या प्रसंगी उपस्थित होते.
    नवनिर्वाचित आगार व्यवस्थापक विजय घोलप हे पिंपळगाव (डोळा) येथील जावई बंधू असून विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले यांचे जावई असल्याने या सत्कार सोहळ्याला एक विशेष आपुलकीची किनार लाभली.
    या सन्मान सोहळ्यामुळे स्नेह, आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी घोलप यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
error: Content is protected !!