March 21, 2026

“कळंब आगारात दुहेरी सोहळा!” नवीन आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांचा सत्कार;खताळ यांना भावपूर्ण निरोप

  • कळंब ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – कळंब आगारात नवनिर्वाचित आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांचा कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला.याचवेळी माजी आगार व्यवस्थापक खताळ यांचा भावपूर्ण निरोप समारंभही पार पडला.या दुहेरी सोहळ्यामुळे आगार परिसरात आनंद व कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी विजयकुमार घोलप यांचे पुष्पहार घालून व सत्कारचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी घोलप यांनी सर्व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने आगाराचा विकास आणि सेवा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    त्यानंतर माजी आगार व्यवस्थापक खताळ यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला.त्यांच्या कार्यकाळातील योगदानाची उपस्थितांनी कृतज्ञतेने आठवण करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    या प्रसंगी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवीकांत शिंदे,सचिव नितीन गायकवाड,कोषाध्यक्ष प्रशांत गायकवाड,प्रसिद्ध प्रमुख प्रकाश पटेकर तसेच लक्ष्मण जानराव,महेंद्र शेंडगे,विलास थोरात,डी.के.बीटे,अशोक रणदिवे,पांडुरंग गरड,सुनील जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    तसेच संघटनेतील महिला कर्मचारी पालके मॅडम,प्रियंका शिंदे,अनुराधा भोसले यांचीही उपस्थिती होती.पवार डी.एस., प्रशांत वेदपाठक,एम.बी.राऊत तसेच इतर कर्मचारी आणि दैनिक पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी विलास मुळीक यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
    एकूणच,कळंब आगारात पार पडलेला हा सत्कार व निरोप समारंभ कर्मचारी ऐक्य,स्नेह आणि परंपरेचे प्रतीक ठरला.
error: Content is protected !!