March 21, 2026

शहीद भगतसिंग प्राथमिक विद्यानिकेतनमध्ये स्वयंशासन दिन उत्साहात

  • “विद्यार्थ्यांनी घेतली शाळेची धुरा!”
  • कळंब – कळंब येथील शहीद भगतसिंग प्राथमिक विद्यानिकेतनमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार (ता.२०) रोजी स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व,जबाबदारी आणि शिस्त यांचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले.
    या दिवशी रुद्र गणेश इंगळे या विद्यार्थ्याने एक दिवसाचा मुख्याध्यापक म्हणून शाळेचे कामकाज यशस्वीपणे सांभाळले. तसेच सम्यक टोपे,अभिजित लोमटे,मसिरा बाबा पठाण, अमृता सुडके,अंकिता आळने, मुशहिद तांबोळी,मुद्दासिर,राज डोंगरे,अथर्व नाईकवाडे,पूजा गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे अध्यापन करत शिक्षकांची भूमिका समर्थपणे पार पाडली.
    याच दिवशी “गुढी पाडवा – प्रवेश वाढवा” या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पहार व साखरगाठी हार घालून स्वागत करण्यात आले.तसेच नवागत विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिलचे वाटप करून त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.
    कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक मंगेश यादव,संगीता करपे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता याटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश बच्छाव यांनी केले,तर आभार प्रदर्शन दत्तात्रय तुपसमुद्रे यांनी मानले.
    या प्रसंगी अलका मडके, संगीता धुमाळ,मायादेवी सांजेकर,वर्षा बन आदी शिक्षिका उपस्थित होत्या.
    स्वयंशासन दिनाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन आनंदात करण्यात आली.
    एकूणच,या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि शालेय जीवनाविषयीची जबाबदारी अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
error: Content is protected !!