March 13, 2026

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.12 मार्च रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 131 कारवाया करुन 1,15,000 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.11.03.2026 रोजी 09.55 ते 11.10 वा. सु. बेंबळी पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-सत्यवान भगवान कांबळे, वय 46 वर्षे, रा. बरमगाव बु. ता. जि. धाराशिव हे 09.55 वा. सु. बरमगाव बु. येथील गंगा गोदु मंदीराचे समोर मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले बेंबळी पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे-रामहरी हणमंत ढवळे, वय 36 वर्षे, रा. बरमगाव बु. ता. जि. धाराशिव हे 11.10वा. सु. कल्याण रुईभर पाटी येथे रोडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्या व मोटरसायकलसह एकुण 610 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले बेंबळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • परंडा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.11.03.2026 रोजी 18.45 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत जवळा निजाम ते ईडा रोडचे डावे बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-मच्छींद्र शिवदास कातुरे, वय 64 वर्षे, रा. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव हे 18.45 वा. सु. जवळा निजाम ते ईडा रोडचे डावे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,140 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले परंडा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.12.03.2026 रोजी 15.30 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत महादेव रेस्टॉरंट चे पाठीमागे दुकानामध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अनिकेत धनराज सोनकांबळे, वय 26 वर्षे, रा. भिमनगर ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. महादेव रेस्टॉरंट चे पाठीमागे दुकानामध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,120 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • भुम पोलीस ठाणे:आरेापी नामे-हनुमंत साधु लोखंडे, वय 52 वर्षे, रा. घाटपिंपरी ता. वाशी जि. धाराशिव, कुमार प्रकाश चंदणशिवे, वय 36 रा. आरसोली ता. भुम जि. धाराशिव, मनोहर केरबा सानप, वय 73 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव, रविंद्र विष्णुदास कुटे, वय 45 वर्षे, रा. सोनगिरी ता. भुम जि. धाराशिव, शंकर सुनिल कानडे, वय 32 वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता. भुम जि. धाराशिव, राजेंद्र हरीभाउ गपाट, वय 52 वर्षे, रा. दिंडोरी ता. भुम जि. धाराशिव,बालाजी उत्रेश्वर घोडसे, वय 35 वर्षे, रा.घाटपिंपरी ता. वाशी जि. धाराशिव, दयानंद विष्णु देवकते, वय 31 वर्षे,रा. साडेसांगवी ता. भुम जि. धाराशिव, बंडु श्रीमंत डुकरे, वय 38 वर्षे, रा. तांबेवाडी ता.भुम जि. धाराशिव, संस्कार शिवाजी भोरे, वय 21 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.12.03.2026 रोजी 10.50 ते 20.15 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे वाहन क्र एमएच 25 आर 6077,छोटा हत्ती क्र एमएच 12 आरएन 5579, क्रुझर क्र एमएच 25 ए 2272, वाहन क्र एमएच 25 एजे 4898, वाहन क्र एमएच 13 सीयु 4978, क्रिऐटा वाहन क्र एमएच 25 एडब्ल्यु 0814, वाहन क्र एमएच 25 पी 4676 व बोलेरो वाहन क्र एमएच 14 ईएम 3494, सुप्रो वाहन क्र एमएच 25 एजे 8068 व छोटा हत्ती क्र एमएच 25 एजे 8417 ही वाहने अलमप्रभु रोड भुम, प्रतिक पेट्रोलपंपा समोर भुम, गोलाई चौक भुम, तहसिल कार्यालय भुम, फलोरा चौक भुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये भुम पो.ठा. येथे स्वतंत्र 10 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
  • बेंबळी पोलीस ठाणे : सार्वजनिक रस्त्याचेकडेला हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत कणाऱ्यांवर बेंबळी पोलीसांनी दि. 12 मार्च रोजी 13.10 ते 16.00 वा. दरम्यान कारवाई केली. ताकविकी ता. जि. धाराशिव येथील ग्रामस्थ-संभाजी अरुण जाधव, वय 33 वर्षे, देवानंद उत्तमराव कांबळे, वय 52 वर्षे,रा. संभाजी चौक भुई गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी ताकविकी पाटी येथे तोरंबा जाणारे रोडलगत नॅशनल चिकन सेंटरच्या शेडमध्ये, श्री तुळजाभवानी चिकन सेंटर येथे व छत्रपती शिवाजी महाराज चौक केशेगाव येथे रोडलगत आपल्या हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असताना बेंबळी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द भा.न्या.सं. कलम- 287 अन्वये बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
  • “दरोड्याची तयारी आसणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बबन रंगनाथ शिंदे, लहु आबा शिंदे, तानाजी अशोक काळे, सोनु बबन शिंदे, सुभाष शिवाजी शिंदे सर्व रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव हे दि. 11.03.2026 रोजी 23.30 वा. सु. ते दि.12.03.2026 रोजी 00.10 वा. सु.शेंडी शिवारातील कमळेश्वर पारधी पिडी कडे जाणारे रस्त्याजवळ दरोड टाकण्याचे उद्देशाने एकत्र येवून दरोड्याचे तयारीनीशी स्प्लेंडर क्र एमएच 25 बीडी 1310, मोटर सायकल क्र एमएच 25 एआर 6320,लोखंडी कोयते 4, तलवार, कॅरीबॅग मध्ये तिखट पावडर असा एकुण 1,40,000₹ किंमतीचे सामान नमुद आरोपींच्या कब्जात बाळगलेले वाशी पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम वसंतराव यादव, पोह/1516 नेमणुक पोलीस ठाणे वाशी यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310(4),(5) सह कलम 4/25 शास्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-विश्वास उर्फ सगुना अशोक काळे, वय 20 वर्षे, श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार, वय 21 वर्षे, विक्रम आप्पा पवार, वय 20 वर्षे, दिपक उर्फे बब्बी विलास पवार, वय 19 वर्षे, दिपक उर्फ आकड्या नितीन पवार, वय 20 वर्षे, कालीदास उर्फ बापु फुलचंद काळे, वय 19 वर्षे, सुरेश उर्फ आबा बापु पवार, वय 20 वर्षे, तानाजी सुर्यभान पवार, वय 70 सर्व रा. कल्पाना नगर पारधी पिडी कळंब, बालु उर्फ बालाजी शंकर पवार, वय 22 वर्षे, रा. शेही बाजार समोर कळंब, दिपक उर्फ बजरंग रवि काळे, वय 20 रा. जुनी दुध डेबरी कहंब तसे इतर 6, बड्या उर्फ महादेव कल्याण पवार, मुन्ना उर्फ पोपट सुभाष पवार, वय 29 दोघे ररा. कल्पना नगर पारधी पिडी कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.12.03.2026 रोजी 04.30 वा. सु.मार्केट कृषी उत्पन्ना बाजार समिती कळंब कार्यालयाचे पाइीमागे पाण्याचे टाकीजवळ कळंब येथे दरोड टाकण्याचे उद्देशाने एकत्र येवून दरोड्याचे तयारीनीशी,लोखंडी 2 तलवार, लोखंडी गज, लोखंडी रॉड, एक दोरी, 2 बॅटरी, कॅरीबॅग मध्ये तिखट पावडर व एककाळ्या रंगाचे हेक्झा ब्लेड काळ्या हॅण्डल असणारी एकुण 1,845₹ किंमतीचे सामान नमुद आरोपींच्या कब्जात बाळगलेले कळंब पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रभा दासराव पुंडगे,महिला सहा पोलीस निरीक्षक नेमणुक पोलीस ठाणे कळंब यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310(4),(5) सह कलम 4/25 शास्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- रोहीत अशोक कासीदकर, वय 35 वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांचे ट्रक क्र एमएच 09 ईएल 7756 ही दि. 11.03.2026 रोजी 20.30 वा. सु. ते दि. 12.03.2026 रोजी 06.00 वा. सु.डिकसळ येथील मोहेकर कॉलेज समोर उभी केली असता ट्रक मधील 18 कट्टे कांद्याचे पोते एकुण 9,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीत कासीदकर यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-नागनाथ सिध्देश्वर बचापे, वय 45 वर्षे, रा. काळेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे काळेगाव शिवारातील साठवण तलावावरील ई के मोटारीचे वेगवेगळ्या कंपनीचे 3200 फुट चार एमएम कॉपरचे वायर अंदाजे 67,200₹ किंमतीचा माल हा दि.10.03.2026 रोजी 21.30 ते दि. 11.03.2026 रोजी 06.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागनाथ बचापे यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
  • “आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • भुम पोलीस ठाणे:मयत नामे-रणजीत सर्जेराव सानप, वय 42 वर्षे, रा. उळुप ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.11.03.2026 रोजी 18.58 वा.सु. ते दि.12.03.2026 रोजी 13.28 वा. पुर्वी रामेश्वर येथे व बह्राणपुर शिवारातील चौघुले यांचे शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-औदुंबर उर्फ पिनु विष्णु दराडे रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी त्याचे उस तोडीचे उचल घेतलेले पैसे परत न केल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने मयत रणजीत यास रामेश्वर येथे बसवून ठेवून मारहाण करुन दिलेल्या त्रासाला कंटाळुन मयत रणजीत सानप यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तानाजी पंडीत सानप, वय 19 वर्षे, रा. उळुप ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 127(2), 115(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-सोमनाथ महादेव कांबळे, रा. नांदगाव ता. वाशी जि. धाराशिव व इतर एक इसम यांनी दि.07.03.2026 रोजी 19.30 वा. सु. तेरखेडा शिवारातील शेत गट नं 1075 मधील शेतामध्ये फिर्यादी नामे-महादेव ज्ञानोबा मोराळे, वय 50 वर्षे, रा. वडजी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पैसाची मागणी केली असता फिर्यादी म्हणाले की माझ्या कडे पैसे नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव मोराळे यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.दं. वि.सं.कलम 118(2), 329(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे : मयत नामे-सुधीर विश्वनाथ वाघमारे, वय 52 वर्षे, रा. रत्पापूर ता. कळंब जि. धाराशिव हे दि.28.02.2026 रोजी 08.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एए 3840 वरुन जात होते. दरम्यान सेंट्रल बिल्डींग चौक ते हनुमान चौक धाराशिव येथे मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 8748 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयने व निष्काळजीपणे अति वेगान चालवून सुधीर वाघमारे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात सुधीर वाघमारे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. नमुद मोटरसायकल चालक हा न थांबता निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महावीर विश्वनाथ वाघमारे, वय 48 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह 134 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!