March 11, 2026

दादर रेल्वे स्टेशनला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी” नाव द्या;अन्यथा २ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

  • कळंब – मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनला “डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन” असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.संबंधित मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    या मागणीसाठी दि.१७ मार्च २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासनाने मागणीची दखल घेतली नाही,तर दि.२ एप्रिल २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येतात.त्यामुळे दादर रेल्वे स्टेशनला “डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन” असे नाव दिल्यास देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सोयीचे होईल तसेच महामानवाच्या कार्याला योग्य सन्मान मिळेल, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
    निवेदन देताना जिल्हाध्यक्ष धाराशिव राजाभाऊ (अण्णा) गायकवाड,तालुकाध्यक्ष भारत कदम, उपतालुकाध्यक्ष गौतम हजारे,शहर प्रमुख नागेश धीरे, मुकेश गायकवाड,बाबासाहेब टोपे,बाबासाहेब ओव्हाळ, भिवाजी ताकपिरे यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!