March 11, 2026

प्रा.अर्चना रामदास मुखेडकर यांना “नेशनस् प्राइड – वुमन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड 2026” प्रदान

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील प्रा. अर्चना रामदास मुखेडकर
    (सहाय्यक प्राध्यापक,वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) यांना “शी इन्स्पायर इंडिया” याअंतर्गत द इंडियन फोरम फॉर सोशल लीडर्स अँड अचिव्हर्स,तामिळनाडू. या नीती आयोग व भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत संस्थेतर्फे “नेशनस् प्राइड – वुमन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड 2026” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 निमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे समर्पण, नेतृत्वगुण आणि समाजाभिमुख कार्य याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
    प्रा.मुखेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता,संशोधनाची आवड आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.तसेच समाजाभिमुख उपक्रम,शैक्षणिक मार्गदर्शन आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
    या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, संचालक डॉ.संजय कांबळे, प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,
    उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव,उपप्राचार्य जयंत भोसले, तसेच प्रबंधक हनुमंत जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले. याचबरोबर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
    प्रा.अर्चना मुखेडकर यांना मिळालेल्या या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना आणि महिलांना प्रेरणा मिळत आहे.
error: Content is protected !!