March 6, 2026

केडगाव येथे एसटी बसची मार्ग तपासणी;अधिकाऱ्यांच्या वेशभूषेबाबत प्रश्न

  • कळंब–माणगाव मार्गावरील एसटी बसची केडगाव येथे तपासणी
  • कळंब – दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता कळंब येथून माणगावकडे निघालेली एसटी बस दुपारी सुमारे 1:15 वाजता केडगाव येथे मार्ग तपासणी अधिकाऱ्यांनी थांबवून प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली.बस उभी करूनच ही तपासणी करण्यात आली.
    मात्र या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांच्या वेशभूषेबाबत काही प्रश्न उपस्थित झाले. तपासणी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने गणवेश परिधान केला होता, परंतु त्या गणवेशावर नाव असलेला बॅज नव्हता. तसेच दुसरे एक अधिकारी गणवेशाशिवाय असल्याचेही प्रवाशांच्या निदर्शनास आले.
    यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी केलेली तपासणी ही नियमित कारवाई होती की विशेष तपासणी, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
    दरम्यान,सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी नियमित गणवेश व ओळखपत्रासह काम करणे अपेक्षित असते,अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
error: Content is protected !!