Skip to content
- कळंब (माधवसिंग राजपूत) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी कळंब तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली.जिल्हा परिषदेत महायुतीने ६ जागांवर विजय मिळवला,तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने २ जागांवर यश संपादन केले. पंचायत समितीत मात्र महायुती व उबाठा गटाला प्रत्येकी ८ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे.
*जिल्हा परिषद गटांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.*
ईटकुर – अनंत लंगडे (शिवसेना शिंदे) ६९४३ मते,पल्लवी बळवंत तांबारे (उबाठा) ४८६१ मते. अनंत लंगडे २०८२ मतांनी विजयी.मंगरूळ – जयवंत कुंभार (भाजप) ६२००, बालासाहेब जाधवर (उबाठा) ५३१३.जयवंत कुंभार ८८७ मतांनी विजयी.
डिकसळ – पूजा शिंदे (शिवसेना शिंदे) ५९५३, वर्षा मस्के (उबाठा) ४५५७.पूजा शिंदे १३९६ मतांनी विजयी.शिराढोण – कांचनमाला सांगवे (उबाठा) ४८८८,नितीन यादव (राष्ट्रवादी श.प.) ४८५३.कांचनमाला सांगवे ३५ मतांनी विजयी.नायगाव – उद्धव शितोळे (भाजप) ५३२२,अनिल साळुंखे (उबाठा) ५२०९.उद्धव शितोळे ११३ मतांनी विजयी.
खामसवाडी – विश्वास कोकणे (भाजप) ४०३०,मनीषा वाघमारे (उबाठा) ३५७१.विश्वास कोकणे ४५९ मतांनी विजयी.मोहा – रूपाली नागटिळक (उबाठा) ५४९६,सुजाता मडके (अपक्ष) ४१२१.रूपाली नागटिळक १३७६ मतांनी विजयी.येरमाळा –अनुजा कोकाटे (भाजप) ६८७१,सुनंदा वाघमारे ५५२१.अनुजा कोकाटे १३५० मतांनी विजयी.
*पंचायत समिती गणांचे निकाल हा पुढीलप्रमाणे आहेत.* ईटकुर – रामचंद्र सांगळे (भाजप) २६८५, बाबासाहेब कोठावळे (अपक्ष) २६२६. सांगळे ५९ मतांनी विजयी.मस्सा खंडेश्वरी – राजश्री वरपे (शिवसेना शिंदे) ४११२, तुकाराम थोरात (उबाठा) ३६५५. वरपे ४५७ मतांनी विजयी.मंगरूळ – प्रणिता चव्हाण (भाजप) ३४२०, शारदा गायकवाड (उबाठा) ३१३०. चव्हाण २९० मतांनी विजयी.
हसेगाव केज – राणी राऊत (शिवसेना शिंदे) ३३६१, लक्ष्मी तोडकर (उबाठा) ३३१८. राऊत ४३ मतांनी विजयी.डिकसळ – नामदेव जाधव (शिवसेना शिंदे) २४८७,सचिन काळे (उबाठा) २४५६.जाधव ३१ मतांनी विजयी.
लोहटा पूर्व – इंदुबाई ओव्हाळ (भाजप) ३८०७,सोनाली झोंबाडे (उबाठा) २६१०.ओव्हाळ ११९७ मतांनी विजयी.शिराढोण – गजानन माकोडे (भाजप) २२८८, ज्ञानेश्वर खडबडे (उबाठा) १८१५. माकोडे ४७३ मतांनी विजयी.जवळा खुर्द – मनोज घोगरे (उबाठा) ३२५८,पांडुरंग घोगरे (शिवसेना शिंदे) २०५८. मनोज घोगरे १२०० मतांनी विजयी.नायगाव – सीमा टेकाळे (उबाठा) १९८२,मनीषा टेकाळे १९२४. सीमा टेकाळे ५८ मतांनी विजयी.रांजणी – योगेश्वरी पवार (उबाठा) २३७१,मनीषा देशमुख (शिवसेना शिंदे) २१५८.पवार २१३ मतांनी विजयी.खामसवाडी – सुवर्णा पाटील (उबाठा) २२००, किरण पाटील (भाजप) १९६४. सुवर्णा पाटील २३६ मतांनी विजयी.देवळाली – उमाकांत एडके (उबाठा) २१७७, सचिन एडके (शिवसेना शिंदे) २०३४. उमाकांत एडके १४३ मतांनी विजयी.मोहा – अनुराधा दिघे (उबाठा) २९७२, पूजा नागटिळक (अपक्ष) १८६२. दिघे १११० मतांनी विजयी.गौर – श्याम देशमुख (उबाठा) ३०६२, लालासाहेब देशमुख (भाजप) २१६८. श्याम देशमुख ८९४ मतांनी विजयी.येरमाळा – वृषाली पाटील (उबाठा) ४१७५, उषाबाई बारकुल (भाजप) ३६५५. पाटील ५२० मतांनी विजयी.चोराखळी – अल्का खुणे (भाजप) २४३८, शिल्पा ओव्हाळ (उबाठा) २३४३. खुणे ९५ मतांनी विजयी.या निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील व भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे व सहाय्यक निवडणूक अधिकारी हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जिल्हा परिषदेत महायुतीने आघाडी घेतली असली, तरी पंचायत समितीतील ८-८ च्या बरोबरीमुळे सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय अत्यंत चुरशीचा ठरणार आहे.
error: Content is protected !!
More Stories
अजित पिंगळे यांची शिवसेना धाराशिव–कळंब जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी