कळंब – कळंब येथील पु.सावरगांव येथील समता नगर परिसरातील तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.या जयंतीनिमित्त समाजातील महिलांसह लहान मुलांचा सहभाग लक्षणीय ठरला. रमाई जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विशेषतः लहान मुलांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धी, आत्मविश्वास व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण झाली.त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या.रांगोळी स्पर्धेत महिलांनी रंगीबेरंगी कलाकृती साकारत कार्यक्रमात आनंदाची रंगत भरली. महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिकच उत्साही वातावरणात पार पडला.या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन विशाखा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एस.एम.कांबळे,विशाल वाघमारे,किशोर वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी