August 11, 2025

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा

  • नांदेड (जिमाका) – आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सोमवार 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले आहे.
    मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने आयोजित या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. यात इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशीनिस्ट, फिटर, टर्नर, मेकॅनिक, वेल्डर एकुण 180 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन एस. व्ही. सुर्यवंशी अंशकालीन प्राचार्य मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे.
error: Content is protected !!