_धुत्ता येथे CSR प्रकल्पांतर्गत शेतकरी जनजागृती कार्यशाळा_
धाराशिव – या वर्षी धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जमिनीच्या वरच्या थरात अतिरिक्त पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाले,तर काही महिन्यांतच पुन्हा पाणीटंचाई निर्माण होते.या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून उर्ध्वंम चे पेटंटेड बोरचार्जर तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. धुत्ता येथे CSR प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.बोरचार्जर तंत्रज्ञानामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी बोअरवेलद्वारे थेट भूगर्भातील खोल जलधरात मुरवले जाते. त्यामुळे भूजल पातळी वाढते, बोअरवेलचा पाणी देण्याचा कालावधी वाढतो. या CSR प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ५० अल्पभूधारक शेतकऱ्यांना बोरचार्जर तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.लाभार्थी संख्या मर्यादित असल्याने प्रथम नोंदणीस प्राधान्य दिले जाणार आहे. उर्ध्वंम हे पुणेस्थित सोशल इम्पॅक्ट स्टार्टअप असून महाराष्ट्रासह १२ राज्यांमध्ये ५,७०० हून अधिक बोअरवेलवर बोरचार्जरची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बोरचार्जरचा लाभ घेतलेला आहे. यावेळी उर्ध्वम चे तांत्रिक अधिकारी फिरोज पटेल व प्रफुल्ल पाटील यांनी शेतकऱ्यांना बोरचार्जर नेमके कसे काम करते याबद्दल सोप्या शब्दांत माहिती दिली.जिल्ह्यात अधिकृत अंमलबजावणी संस्था म्हणून विश्वश्री सामाजिक संस्था काम करते.विश्वश्री चे संस्थापक व अध्यक्ष आकाश मोरे ही यावेळी उपस्थित होते.गावातील सामाजिक कार्यकर्ते नसीरुद्दीन काझी यांनी गावात हा प्रकल्प राबवला जावा यासाठी पुढाकार घेतला आहे.५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.त्यांनी लगेच नाव नोंदणी करून घेतली. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी ८९५६९६०५६७ / ६६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उर्ध्वम चे मराठवाडा विभागाचे विपणन अधिकारी किरण सावंत यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान