वाठवडा – कै. आण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय, वाठवडा ता.कळंब जि.धाराशिव येथे शुक्रवार,दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजनाचे औचित्य शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी प्रल्हाद आल्टे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याची आणि शिक्षणाच्या महत्त्वाची प्रेरणादायी माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक बालाजी आल्टे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देत, शिक्षणाबद्दल आकर्षण व जागृती निर्माण करणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक झुंबर पिंपळकर यांनी तर आभार प्रदर्शन गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड