March 26, 2026

कळंब नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जनकल्याण अर्बन बँकेतर्फे भव्य सत्कार

  • कळंब – जनकल्याण अर्बन को-ऑप.बँकेच्या वतीने गुरुवार (दि.१) रोजी कळंब नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला.
    या प्रसंगी बँकेचे संस्थापक अध्यक्ष उमेशराव कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना, सामाजिक,राजकीय व आर्थिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सन्मान करण्याची परंपरा बँकेने स्थापनेपासून जोपासल्याचे सांगितले.उपस्थित सर्व मान्यवरांना पुढील कार्यकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
    सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई शिवाजी कापसे यांच्यासह रोहन राजेश पारख,लखन बळीराम गायकवाड, हर्षद अंबुरे,अमरबीन चाऊस, अतुल कवडे,शितल चोंदे,शाला शिवा पवार,भूषण करंजकर तसेच योजना सदस्य अनंत वाघमारे यांच्या पत्नी यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला.
    या कार्यक्रमाला जनकल्याण अर्बन बँकेचे अध्यक्ष उमेशराव कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सांजेकर,संचालक संदीप बावीकर,महेश जोशी,राजाभाऊ दीक्षित,अशोक शिंपले यांसह शिवसेना नेते अजित पिंगळे, बाजार समिती सभापती शिवाजी कापसे,भाजप तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुंके,अरुण चौधरी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनंत वाघमारे,तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,भाजप सरचिटणीस प्रणव चव्हाण,संतोष कसपटे,नेते मेघराज देशमुख,राजेंद्र मिटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!