कळंब – शहरातील सुभाष लाटे परिवाराच्या वतीने दि.१ जानेवारी २०२६ रोजी ओम बालरुग्णालय व दंत दवाखान्याचे संचालक डॉ. रमेश जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छांसह हा सोहळा उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे,शारदा लाटे-मुंढे,डॉ.संजीवनी जाधवर-लाटे,इंजि.भाग्यश्री खराटे-लाटे व ओम जाधवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी डॉ.जाधवर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आरोग्य सेवेत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन