March 26, 2026

मूलभूत सुविधा व शहराच्या विकासासाठी कटिबद्ध – नगराध्यक्षा सुनंदा कापसे

  • कळंब – “शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करत शाश्वत विकासाची दिशा देणे हीच माझी प्राथमिकता असून, नागरिकांचा विश्वास कायम ठेवत पारदर्शक,लोकाभिमुख आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे राबविण्याचा निर्धार आहे,”असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी केले.
  • प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि.२९ डिसेंबर २०२५ वार सोमवार रोजी शहरातील बाबा नगर येथील साक्षी कोचिंग क्लासेस येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.संजीवनी जाधवर यांनी भूषविले.
    कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांचा अध्यक्षा डॉ.संजिवनी जाधवर यांच्या हस्ते पुष्पहार,बुके व “विरंगुळा” हे अग्रलेख व पथनाट्यांचा संग्रह असलेले पुस्तक देवून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

  • नगराध्यक्षा सौ.कापसे पुढे म्हणाल्या की,शहरातील रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता व्यवस्था,स्ट्रीटलाईट,कचरा व्यवस्थापन,आरोग्यसुविधा, सार्वजनिक उद्याने आणि सामाजिक-सांस्कृतिक पायाभूत सुविधा या क्षेत्रांत सक्षम नियोजन करून कामे हाती घेतली जातील. वाढते शहरीकरण आणि नागरिकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक विभागाचा संतुलित विकास करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.
    प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून डॉ.
    संजीवनी जाधवर यांनी नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला.त्या म्हणाल्या,“स्त्रिया जसा संसार सुयोग्य रितीने सांभाळतात,तसाच नगरपरिषदेचा कारभारही सुनंदाताई कापसे सक्षमपणे सांभाळतील,”असा विश्वास व्यक्त करून त्यांनी पुढील काळातील विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले. सचिव अविनाश घोडके यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष राकेश घोडके यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
  • याप्रसंगी कार्यक्रमास लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,तालुकाध्यक्ष नागेश धीरे,व्यापारी सुरेश कटकुरे,राजेंद्र वाघमारे,गोकुळ लोकरे,दिनेश बर्वे,पत्रकार महेश मिटकरी,पत्रकार महेश फाटक, पत्रकार अमोल रणदिवे,शुभम थोरात,रोहित कापसे,ज्ञानेश्वर काळे,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी,विविध सामाजिक कार्यकर्ते,व्यावसायिक उपस्थित होते.
error: Content is protected !!