कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. इयत्ता सहावीतील कु.संतोषी जनार्धन भामरे हिने ७२ गुण मिळवले असून,इयत्ता नववीतील उदय हरीश काळे (६४),शाश्वती सतीश मडके (५४),मृणाल संतोष पवळ (५४) व पार्थ प्रमोद तांबारे (४९) या विद्यार्थ्यांची पुढील प्रॅक्टिकल राऊंडसाठी निवड झाली आहे.परीक्षेला बसलेल्या एकूण ३७ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे यश विद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे. या यशाबद्दल विद्याभवन हायस्कूल,कळंब प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.हा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी.,उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही. एस. तसेच पर्यवेक्षिका श्रीमती कोळी जे. एन. यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर