February 9, 2026

शिर्डीचा प्रसिद्ध ‘ग्रॅज्युएट की चहा’ कळंबमध्ये – चहाप्रेमींसाठी आनंदाची बातमी!

  • कळंब – शिर्डीतील सुप्रसिद्ध ग्रॅज्युएट की चहा आता कळंबकरांसाठीही उपलब्ध झाली आहे.शाखा क्र.७७१ चा भव्य शुभारंभ शुक्रवार,दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा.नगर परिषदेसमोर,छत्रपती संभाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे प्रियदर्शनी को–ऑप–लि.बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर भवर व प्रोप्रायटर अजित हौसलमल यांचे वडील बंडू हौसलमल,भाऊ अभिजीत हौसलमल व वहिनी श्रीमती हौसलमल यांच्या हस्ते रेबिन फित कापून करण्यात आले.
    संस्थापक निलेश जाधव यांच्या प्रेरणेतून सुरू होणाऱ्या या शाखेत गुळाचा चहा आणि खास लस्सी हे विशेष आकर्षण ठरले आहे.
    पहिल्या दिवशी फ्री टेस्टिंगची सुविधादेखील ठेवण्यात आली होती.
    याप्रसंगी रामराजे खोसे,भीमा हगारे,अतिश वाघमारे,अविनाश घोडके,प्रशांत गायकवाड,नटराज गायकवाड,सौरभ खंडाळे,प्रदिप हौसलमल,संघरक्षित गायकवाड,संतोष सोनवने,प्रविण देशमाने,लखन गायकवाड,प्रतिक हौसलमल,जितेन्द्र देशमाने,रतन आवाड शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवर,मित्रपरिवार व नातेवाईकांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!