March 26, 2026

मोहेकर महाविद्यालयाचा रग्बीत दमदार डंका;दोघींची राष्ट्रीय संघात निवड

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने, तसेच प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंबच्या मुलींनी राज्यस्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.अहमदनगर येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत बलाढ्य ठाणे संघाचा पराभव करत मोहेकर महाविद्यालयाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.
    याच कामगिरीच्या बळावर महाविद्यालयातील कु. प्रांजली भराटे (१२ वी कला) व कु. श्वेता मगर (११ वी विज्ञान) या दोन विद्यार्थिनींची महाराष्ट्राच्या राष्ट्रीय रग्बी संघात निवड झाली असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
    २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान कोकमठाण (अहमदनगर) येथील आत्मा मलिक क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मोहेकर महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळाचे दर्शन घडवले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या सामन्यात त्यांनी ठाणे संघावर मात करून कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली.
    रग्बी संघातील खेळाडू – प्रांजली भराटे,वैष्णवी माळी,श्वेता मगर, श्रावणी कुरूंद,साक्षी भराटे, अपेक्षा जावळे,संस्कृती गव्हार, दीप्ती शिंदे,दिव्या निंबाळकर, ऋतुजा दोंदे,रूपाली कुपकर व रूपाली कुरूंद यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
    श्रीमती सरस्वती वाघमारे,क्रीडा शिक्षक निलेश मुंडे, राजाभाऊ शिंदे,गंधार सर आणि अनिल शिंदे यांच्या प्रशिक्षणामुळे या मुलींनी राज्यस्तरावर आपली छाप पाडली.
    या दैदिप्यमान यशाबद्दल सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ. कमलाकर जाधव,प्रा.जयवंत भोसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!