February 9, 2026

शिंदे शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश सोहळा

  • कळंब – शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत दि.१२ नोव्हेंबर २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब येथे शिवसेना एकनाथ शिंदे मध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
    समाजातील विविध घटकांतील मान्यवरांनी एकजुटीचा आणि परिवर्तनाचा संदेश देत पक्षात प्रवेश केला.या प्रसंगी धनंजय चिलवंत,संदिपान सोनवणे,नितीन कसबे,जीवन पटेकर,अकबर शेख, गणेश आळणे,अनिल शिंदे,सुहास वाघमारे,संतोष आळणे,संभाजी डोंगरे,बापू शिंदे,शिवाजी भोसले, अतिश कांबळे,राजेंद्र धेडुळे, सचिन जोगदंड,अक्षय तीबोले, अभिजीत शिंदे,आनंद कांबळे, किरण जाधव,बाबा बचुटे पिंटू गंदुरे,निलेश कांबळे,बालाजी खैरमोडे,बाळासाहेब शिंपले, नवनाथ शेंडगे,किसन कसबे,भैया गायकवाड,बाळू कांबळे,ऋषी पटेकर,कृष्णा सुरवसे,धनंजय शिंपले, राजु वाघमारे आणि सोनू पारवे या मान्यवरांनी आपला विश्वास व्यक्त करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
    शिवाजी (आप्पा) कापसे यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “हा पक्षप्रवेश केवळ सदस्यसंख्या वाढवण्यासाठी नाही, तर परिवर्तनाची आणि विकासाची सुरुवात आहे.”
    या सोहळ्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. एकजुटीने आणि लोकाभिमुख नेतृत्वाखाली कळंब नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी सज्ज होत असलेला हा उत्साह शहरात नव्या राजकीय उर्जेची सुरुवात ठरत आहे.
error: Content is protected !!