कळंब – शांत,संयमी आणि आपुलकीने भरलेले व्यक्तिमत्त्व हे समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरते.अशाच गुणांनी नटलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.डॉ.मिनाक्षी श्रीधर भवर. शिक्षण,समाजसेवा आणि विकास यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. संकटाच्या किंवा आव्हानांच्या काळातही त्या सहजतेने, समजूतदारपणे लोकांना मार्गदर्शन करतात,त्यांच्या नेतृत्वातून समज, सहकार्य आणि सकारात्मकता झळकते.सध्या त्या सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून,शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. फक्त शिक्षण क्षेत्रातच नव्हे,तर समाजसुधारणेसाठी आणि नगर विकासासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांचं नाव कळंबच्या प्रगतीशी जोडले गेले आहे. सामाजिक भान,प्रामाणिकता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या गुणांमुळे त्या जनतेच्या मनातील “विश्वासू नेत्या” म्हणून ओळखल्या जातात. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रा.डॉ.मिनाक्षी भवर यांना नगराध्यक्षपदाचा सन्मान मिळावा,अशी सर्वसामान्य नागरिकांची एकमुखी मागणी होत आहे.त्या केवळ एक उमेदवार नाहीत, तर जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की —”आपले एक मत म्हणजे कळंबच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे.”म्हणूनच सर्व मित्र, नातेवाईक,शेजारी यांना संपर्क साधा,हा संदेश पोहोचवा आणि प्रा. डॉ. मिनाक्षी श्रीधर भवर यांना नगराध्यक्षपदासाठी आपले अमूल्य मत देऊन कळंबचा विकासमार्ग अधिक उजळवा.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन