कळंब – 2023 च्या गळीत हंगामात उसाला प्रति टनाला 3600 रुपये दर द्या, व गेल्या वर्षीच्या गाळप झालेल्या उसाला फायनल चारशे रुपये पेमेंट करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एन. साई. नॅचरल शुगर कारखाना रांजनी चेअरमन बी.बी. ठोबरे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. साहेब…आपण सर्वांचे मार्गदर्शक आहेत, त्या मुळे आपण यंदा उसाला चांगला भाव द्या, अशी विनवणी शेतकरी करत आहेत. गळीत हंगामात उसाची फक्त एफ.आर.पी.रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे. परंतु मराठवाड्यातील एकाही कारखानदारांनी फायनल पेमेंट केलेले नाही. कारखान्या मार्फत शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना रंगराजन समितीच्या शिफारशी प्रमाणे या वर्षाचा शेतकी हंगाम सुरू होण्याअगोदर गतवर्षीच्या गळ्यात झालेल्या उसाचे फायनल बिल प्रति टन 400 रुपयाने करावे, व एक चांगला पायंडा पाडावा अशी मागणी करण्यात आली. यावर्षीच्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला , जोपासण्यासाठी ऊस उत्पादकांना त्रास झालेला आहे .तसेच उत्पादन खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. रानडुकराच्या त्रासाने शेतकऱ्यांच्या उसाचे बरेच नुकसान झालेले आहे. तशा परिस्थितीत ऊस जोपून शेतकरी आपला ऊस ‘ कारखान्यात गाळपास देणार आहे. उसाला चांगला भाव देवून, शेतकरी व कारखाना यांच्यामधील संघर्ष टाळावा.अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मागणी केली. निवेदन देण्यासाठी अँड .विजयकुमार जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्याआघाडी प्रदेशाध्यक्ष, विष्णुदास रामराव काळे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष,सचिन टिळे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष जिल्हाध्यक्ष,चंद्रकांत संदिपान समुद्रे सरचिटणीस,कमलाकर दासराव पवार, कळंब तालुका अध्यक्ष पंकज पाटील कळंब तालुका सरचिटणीस महादेव टेकाळे,अजय शिंदे, शशी चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात