कळंब – प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा मार्ग तयार करत सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांचा खंदा समर्थक म्हणून ओळख असलेला लढवय्या समाजसेवक आबेद बागवान यांनी कळंब नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक ८ मधून नगरसेवक पदासाठी प्रबळ उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळ विक्रीचा व्यवसाय करत उपजीविका करणारा आबेद हा समाजसेवेच्या विविध उपक्रमांतून सदैव अग्रेसर राहिला आहे.कोरोना महामारीच्या काळात शहरातील नागरिकांना मोफत किराणा व फळांचे वाटप करून त्याने आपली सामाजिक बांधिलकी कृतीतून दाखवून दिली.
याशिवाय शहरातील पोलिस स्टेशन,बसस्थानक आणि रुग्णालय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचे उदाहरण त्याने घालून दिले आहे.विविध महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे हे त्याच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. इस्लाम धर्माच्या शिकवणुकीतून व सर्व धर्मातील महापुरुषांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या आबेद बागवान यांनी सांगितले की,मी आजवर लोकांसाठी जे काही केले, ते निस्वार्थ भावनेने केले.आता नगरसेवक म्हणून उभे राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, तर त्या विश्वासाला मी पात्र ठरेन.” शहरातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या आबेद बागवान यांच्या उमेदवारीबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
More Stories
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार