March 26, 2026

मोहा येथे संविधान सभागृह उभारण्याची मागणी — ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून निवेदन

  • महिनाभरात काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
  • धाराशिव — ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहा (ता. कळंब) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संविधान सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
  • येत्या महिन्याभरात संविधान सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात न झाल्यास समाज बांधवांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून देण्यात आला आहे.
  • या वेळी ऑल इंडिया पॅंथर सेना धाराशिव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक कसबे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कसबे, ग्रामपंचायत सदस्य राहुल कसबे, कोंडीबा कसबे, उद्धव कसबे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!