धाराशिव – अभाविपच्या विद्यार्थ्यांनी धाराशिव शहर आणि इतर गावातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय ITI महाविद्यालयासमोर बस सेवा सुरू करण्यासाठी नगरपालिके आणि परिवहन विभागाकडे निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ९:०० वाजता महाविद्यालयासमोरून जाणाऱ्या बसेस आणि सायंकाळी ५:०० नंतर तुळजापूरकडून येणाऱ्या बसेस थांबविण्यात याव्यात. तसेच, ITI महाविद्यालयासमोर बस थांबाव्या आणि बस थांबवण्यात अपयशी ठरलेल्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी निवेदनात पाच दिवसांत समस्यांचे निराकरण करण्याची मुदत दिली असून, अन्यथा तीव्र रोष व्यक्त केला जाईल असे स्पष्ट केले.यावेळी शहर मंत्री कु.साक्षी पाटील, सहमंत्री गजानन माळी,परमेश्वर सुर्यवंशी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य