धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या वतीने केंद्र सरकार पुरस्कृत National Overseas Scholarship (NOS) २०२५ -२६ करिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या शिष्यवृत्तीकरिता अर्ज NOS पोर्टल (https://nosmsje.gov.in) वरून सादर करता येतील.रिक्त जागा भरण्यासाठी दुसऱ्या फेरीकरिता अर्ज स्वीकृतीची मुदत २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत निश्चित केली आहे. याबाबत सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.nosmsje.gov.in) उपलब्ध आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ ऑक्टोबर २०२५ असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी ही संधी गमावू नये,असे आवाहन श्री.सचिन कवले, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान