धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर २०२५) ते महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत राबविण्यात येणार असून,तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहे. ➡️ पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर) – पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणमुक्ती मोहीम ➡️ दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर) – ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टा वाटप ➡️ तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर) – शेतरस्ते मजबुतीकरण व जनता दरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवा पंधरवड्यात सक्रिय सहभाग नोंदवून विकास प्रक्रियेत सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य