कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य सुरज भांडे यांच्या हस्ते करून करण्यात आली.त्यानंतर प्राचार्य सुरज भांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी आपल्या मनोगतातून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी खाऊवाटप करून समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशिका कोमल मगर,निदेशक बालाजी रामरुळे, आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे,सोनाली ढमाले तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ