February 9, 2026

कुं.तेजस्विनी वमन ची राज्यसेवा पूर्व परीक्षेत वर्ग( 2 )पदावर निवडी बद्दल सत्कार

बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने कौतुक सोहळा

कळंब-नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून कु.तेजस्विनी वमन हिची निवड झाली त्याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने कळंब मध्ये मोठ्या थाटामाटात सत्कार सोहळा संपन्न झाला.गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती कळंब येथे कार्यरत असलेले बिभीषण वमन (जगताप) रा. कन्हेरवाडी ता. कळंब यांची कन्या कु.तेजस्विनी बिभीषण वमन जगताप हिची कृषी आयुक्तालय येथे लघुलेखक निम्न श्रेणी वर्ग 2 या पदावर निवड झाल्याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने ह. भ. प. महादेव महाराज आडसूळ व मान्यवरांच्या शुभहस्ते तेजस्विनी व तिच्या आई-वडिलांचा कळंब येथे शाल ,फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले बिभीशन वमन हे गटशिक्षण कार्यालय कळंब येथे कार्यरत आहेत त्यांचा पहिला मुलगा गव्हर्मेंट कॉलेज एम्स या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत आहे तर दुसरा इंजिनियर करत आहे . तिन्ही मुलांनी आपले नेत्रदीप यश मिळवले राजेंद्र बिक्कड यांनी बिभीशन वमन यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष सांगितला तर बिभीशन वमन म्हणाले की मुलीला गुलाल लागल्याशिवाय हळद लावणार नाही म्हणजे नौकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही ते त्यांनी स्वप्न पूर्ण केले तसेच ते छोट्याशा किरायाच्या रूम मध्ये राहून आपली तिन्ही मुले उच्चशिक्षित केली सत्काराला उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली की मी शेतकऱ्यांची कन्या आहे आणि खूप ,गोरगरीब लोकांना मदत करण्यास सदैव तत्पर राहील या कौतुक सोहळ्यासाठी प्रा.सतीश मातने ,मुख्याध्यापक राजेंद्र बीक्कड, राजेंद्र पवार, डॉ. अशोक शिंपले,प्रा.महादेव गपाट , रूषी कुमार साबळे, रमेश शिंदे ,संतोष मोहिते, प्रदीप यादव ,संदीप मगर, निशिकांत अडसूळ, आप्पासाहेब कस्पटे, अभिजीत डांगरे या सर्वांच्या उपस्थित सत्कार कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड तर आभार प्रदर्शन प्रा.महादेव गपाट यांनी केले.

error: Content is protected !!