February 8, 2026

ज्ञानदीपाचा अविरत प्रकाश देणारा सा.साक्षी पावनज्योत – डॉ.प्रकाश पवार

  • कळंब – “ज्ञानदानाच्या कार्यासोबतच ज्ञान प्रचार आणि प्रसाराचे कार्य करण्यासाठी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी सुरू केलेली पावनज्योत आजही अखंडित असून तिचाच वारसा ‘सा.साक्षी पावनज्योत’ या विशेषांकातून पुढे चालू आहे, याचा अभिमान आहे,”असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रख्यात विचारवंत व लेखक डॉ.प्रकाश पवार यांनी केले.
  • दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे सा.साक्षी पावनज्योतचा “शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी पुण्यस्मरण विशेषांक – २०२५” चे प्रकाशन उत्साहात पार पडले.
  • या प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा अध्यक्ष अनिल मोहेकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठ,कोल्हापूरचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, शिवाजी विद्यापीठाचे प्रख्यात वक्ते डॉ.प्रकाश पवार,उपसंचालक किरण बोंदर,शि.म.ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अशोकराव मोहेकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, कोषाध्यक्ष अंकुश पाटील,ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर,मुख्य संपादक सुभाष घोडके,ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ,उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदी मंचावर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली.त्यानंतर विशेषांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
    विशेषांकातील लेखांमधून गुरुजींनी निजाम राजवटीतील प्रतिकूल परिस्थितीत कसल्याही सोयीसुविधा नसताना केलेला शिक्षण प्रसाराचा त्याग,बहुजन समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले आजीवन प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोकराव मोहेकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दादाराव गुंडरे व आभार डॉ. दिपक सूर्यवंशी यांनी मानले.
  • या कार्यक्रमाला समाजातील नागरिक,माजी विद्यार्थी,स्थानिक मान्यवर व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षण महर्षींच्या कार्याला अभिवादन केले.
error: Content is protected !!