कळंब – अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनातील मुख्य सूत्रधारास अटक करावी या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कळंब येथील शिवाजी चौक ते पोलीस ठाणे असा मॉर्निंग वॉक करून पोलिसांना निवेदन देण्यात आले. २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निग वॉक करत असताना डॉ.नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.त्याला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत.खुनातील संशयित आरोपी म्हणून तपास यंत्रणांनी काही जणांना अटक केली आहे.परंतु खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास यंत्रणांनी पुढील तपास वेगाने करून खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे शोधून काढले पाहिजे अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत,सामाजिक कार्यकर्ते यांच्या जिवाला असलेला धोका संपणार नाही. ही मागणी घेऊन कळंबमध्ये आज दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ०६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवाजी चौकापासून आंबेडकर उद्यान मधील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला अभिवादन करून,पोलीस स्टेशन पर्यंत,आम्ही सारे – दाभोळकर, आम्ही सारे- पानसरे.,शिवराय शाहू फुले आंबेडकर-आम्ही सारे दाभोलकर,खुनामगील मास्टर माईंड वर कारवाई झालीच पाहिजेविवेकाचा आवाज बुलंद करूया,भारतीय संविधान जिंदाबाद,खुनी सनातनी चलेजाव,देशद्रोही,धर्मद्रोही,खुनी सनातनी – चलेजाव अशा घोषणा देत निर्भय मॉर्निंग वॅाक काढण्यात आला. पोलीस स्टेशन मध्ये मुख्य सूत्रधारांना लवकरात लवकर पकडण्यात यावे असे निवेदन देऊन डॉ.नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतिषेश घेतला व समारोप करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे,प्रकाशन विभाग कार्यवाह तुकाराम शिंदे,कळंब शाखाचे कार्याध्यक्ष प्राजक्ता पाटील,प्रधान सचिव संतोष लिमकर, उपाअध्यक्ष सुरेश धावारे,किशन लोंढे,प्राचार्य. जगदीश गवळी,संजय सावंत,प्रा. अनिल जगताप,संदीप सूर्यवंशी, प्रा.अनिल फाटक,डॉ.दत्ता साकोळे,अनिता खंडागळे, सोमनाथ कसबे,विवेक वाहिनीतील सर्व विद्यार्थी व अनिस चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन