August 11, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.09 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 280 कारवाया करुन 2,15,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे-मंगल दत्ता काळे, वय 48 वर्षे, रा. मस्सा ता.कळंब जि. धाराशिव हे दि.09.08.2025 रोजी 19.45 वा. सु पाण्याचे टाकीजवळ आपल्या राहते घराचे बाजूस अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ पोलीस ठाणे परिसरात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे- प्रदीप श्रीमंत लोखंड, वय 42 वर्षे, रा. तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.08.08.2025 रोजी 22.52 वा पोलीस ठाणे धाराशिव चे परिसरात मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालून काच फोडून नुकसान करताना धाराशिव शहर पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1), महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम कलम 3(1) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “खुन.”
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- वैभव चद्रकांत लाकाळ,रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.31.07.2025 रोजी 22.45 वा. सु. पळसप येथे मयत नामे-चंद्रकांत मदन लाकाळ, वय 65 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने रामपाल महाराज यांची भक्ती करुन नको असे बोलण्याचे कारणावरुन खोऱ्याचे दांडयाने मारहाण करुन गंभीर जखमी जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रमोद चंद्रकांत लाकाळ, वय 29 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.09.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे ढोकी येथे भा.न्या.सं.कलम 103(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- सरोज चिकुंद्रे, रा. एंकोडी रोड उमरगा, रेणु पवार, रा. निता जाधव, रा. डिग्गह रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, ह.मु. कालिका माता केंद्र येरमाळा यांनी दि.24.07.2025 रोजी 19.00 वा. सु. ते दि. 25.07.2025 रोजी 07.30 वा. सु. आरती मंगल कार्यालयाच्या शेजारी बायपास रोडलगत अंकुश शिंदे यांचे शेताजवळ उमरगा येथे मयत नामे-अभिषेक कालिदास शिंदे, वय 23 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कालीदास संभाजी शिंदे, वय 54 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे उमरगा येथे भा.न्या.सं.कलम 103(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- विक्की चव्हाण, स्वप्नील पौळ, यश माने, तिघे रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव, सुरज अवधुत, रा. अवधुत वाडी ता. वाशी, पांडु जाधवर, रा. रत्नापुर ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.21.07.2025 रोजी 17.00 वा. सु. येडशी उड्डान पुलाजवळ फिर्यादी नामे-अविनाश हरीदास मोराळे, वय 23 वर्षे, रा.वडजी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश मोराळे यांनी दि.09.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352,351(2), 351(3), 189(2),191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!