कळंब – भीमराव दादा हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सत्य, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्या वाणीला वजन आणि कृतीत पारदर्शकता होती.समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी सदैव न्यायाचे आणि सत्याचे तत्त्व पाळले,अशा शब्दांत डॉ. माणिक डिकले यांनी भीमराव पांचाळ दादा यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त हृदयस्पर्शी उदगार काढले. कै.भीमराव पांचाळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.माणिक डिकले हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ.संजय कांबळे,संपादक सुभाष द.घोडके,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,प्रा.जालिंदर लोहकरे,इंजि. ठोंबरे,काँग्रेस आयचे किसान सेलचे तालुका अध्यक्ष विलास करंजकर,महंमद चाऊस,ह.भ.प अशोक मडके,ह.भ.प महादेव आडसुळ,विश्वकर्मा संघटनेचे पांचाळ आदींनी दादांच्या कार्यावर प्रकाश टाकत श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्षीय समारोपात पुढे बोलताना डॉ.माणिक डिकले म्हणाले की,स्थानिक सामाजिक कार्य,संघटनात्मक बांधणी आणि युवकांना प्रामाणिकपणाचा वारसा देणे,हा त्यांचा जीवनधर्म होता.कोणतीही परिस्थिती असो, भीमराव दादांनी कधीही सत्याचा त्याग केला नाही.त्यांच्या ठाम विचारांमुळे आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले. प्रकाशन कार्यक्रमाच्या सुरुवातीस ह.भ.प पांचाळ महाराज यांचे कीर्तन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांनी केले. या प्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांनीही भीमराव दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात