धाराशिव – (जिमाका) World School Volleyball (U-15 Boys & Girls) Championship ही आंतरराष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात येत आहे.यामध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या निवडीसाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणी दि.२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी,पुणे येथे आयोजित केली आहे. या राष्ट्रीय चाचणीसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या खेळाडूंना सहभागी होता यावे,यासाठी राज्यस्तरीय निवड चाचणी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्यात होणार आहे.त्यासाठी आधी विभागीय निवड चाचणी १४ ऑगस्टपूर्वी घेण्यात येणार असून प्रत्येक विभागातून ५ मुले व ५ मुलींची निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर,धाराशिव जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी हायस्कूल,धाराशिव येथे करण्यात आले आहे.चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१३ या दरम्यान असावा. जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपल्या शाळेतील २ उत्कृष्ट खेळाडूंना आवश्यक कागदपत्रांसह पाठवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
“जनता दरबार” उपक्रमाद्वारे नागरिकांच्या तक्रारींना थेट जिल्हाधिकाऱ्यांची दाद