August 9, 2025

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ७ व ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात

  • धाराशिव (जिमाका) – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ७ व ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
    छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता धाराशिव येथे आगमन.सकाळी ११ : ४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांची निवेदन स्वीकारतील. दुपारी १२:४० वाजता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या समवेत महसूल विभागाचा आढावा घेतील.दुपारी २ वाजता जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा व दुपारी २.४५ वाजता जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतील.
    दुपारी ३:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषद घेतील.दुपारी ४ वाजता भाजप कार्यालय,प्रतिष्ठान भवन येथे राखीव.सायंकाळी ५ वाजता मोटारीने धाराशिव येथून तुळजापूरकडे प्रयाण.सायंकाळी ५:३० वाजता तुळजापूर येथे आगमन व आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.सायंकाळी ६ वाजता भवानी तीर्थकुंड,घाटशीळ रोड पार्किंग तुळजापूर येथे श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल तुळजापूर नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती.सायंकाळी ७ वाजता मोटारीने धाराशिवकडे प्रयाण. सायंकाळी ७:३० वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
    ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता मोटारीने धाराशिव येथून मुरूम,ता.उमरगाकडे प्रयाण.सकाळी ९ वाजता मुरूम येथे आगमन व बसवराज पाटील यांच्याकडे राखीव.सकाळी ९:३० वाजता श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरूम येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थिती.सकाळी ११ वाजता मोटारीने मुरूम येथून जालनाकडे प्रयाण करतील.
error: Content is protected !!