August 9, 2025

सुरजच्या कृषी निविष्ठा विक्रीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पाठबळ

  • धाराशिव (जिमाका) – नोकरीच्या मागे न लागता कुठला उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असली आणि उद्योग व्यवसाय उभारणीला शासनाचे पाठबळ मिळाले की रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग सापडतो. जिल्ह्यातील वाशी या तालुक्याच्या ठिकाणी सूरज मुकुंद चेडे या मराठा समाजातील युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या अर्थसहाय्यातून कुलस्वामिनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कृषी निविष्ठांच्या विक्रीचे दुकान थाटून रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे.
    मागील वर्षी सुरज चेडेला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची माहिती मिळाली.धाराशिव येथे येऊन सुरजने जिल्हा कार्यालय गाठले.तेथे या योजनेबाबतची विस्तृत माहिती जिल्हा समन्वयक यांचेकडून घेतली. त्यानंतर या महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय सुरजने घेतला.त्यानंतर महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एकत्र करून वाशी येथील भारतीय स्टेट बँक शाखेकडे कर्जाची मागणी सुरजने केली.बँकेने या व्यवसायासाठी सुरजला १० लक्ष रुपये कर्ज मंजूर केले.बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर बँकेचे कर्ज मंजुरी प्रमाणपत्र सुरजने ऑनलाईन अपलोड केले.
    वाशी तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी सुरजच्या कृषी केंद्रातून मोठ्या प्रमाणावर कृषी निविष्ठांची खरेदी करू लागले.त्यामुळे सुरजच्या व्यवसायात भरभराट येऊ लागली. सुरजने आतापर्यंत ७ हप्ते ऑनलाईन क्लेम केले.त्याला महामंडळाकडून अंदाजे २० ते ३० हजार रुपये व्याज परतावा मिळाला. महामंडळाच्या या योजनेच्या लाभामुळे सुरजला छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर करता आले.जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील सुरज चेडेने केले.
error: Content is protected !!