August 9, 2025

शिक्षणाशिवाय अर्थकारण मजबूत होणे अशक्य – डॉ. सचिन ओंबासे

  • कळंब – चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतल्याशिवाय अर्थकारण मजबूत होणार नाही व अर्थकारण मजबूत झाल्याशिवाय समस्या सुटणार नाहीत यासाठी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी तालुक्यातील हसेगाव (शि ) येथील माझे गाव माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
    यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,वारकरी संसथेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले,सिद्धिविनायक उद्योग समूहाचे चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ. रमेश जाधवर, कार्यक्रमाचे आयोजक कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संतोष राऊत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, प्रा. सतीश मातने, राजेंद्र बिक्कड, नितीन पाटील, जोतीराम सोनके, पंडितराव टेकाळे आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना ओंबासे म्हणाले की अन्नधान्याला दर गेल्या वीस वर्षांत म्हणावा तसा वाढला नसल्याने तसेच पावसाचा अनियमितपणा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय आजच्या काळात माणूस समाधानी राहू शकत नाही यासाठी ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय वाढले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घेतलेच पाहिजे तरच आपण समृद्ध होऊ शकतो असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन अविनाश पवार यांनी केले व आभार महादेव खराटे यांनी मानले यावेळी ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
  • हे राबविले उपक्रम
  • हसेगावचे भुमिपुत्र संतोष राऊत यांनी माझा गाव माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत गावात एक हजार झाडांचे वाटप केले, आनंदाचा शिधा वाटप, निराधारांना पगार प्रमाणपत्र वाटप, शासकीय नौकरीत भरती झालेली अशलेषा कानडे व कल्पना कानडे चा सत्कार, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पगार सुरवात असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
  • माझ्या गावच्या विकासाची माझी जबाबदारी – संतोष राऊत
  • प्रत्येक गावातून एखाद्या व्यक्ती तरी कुठलयान कुठल्या क्षेत्रात उचपदावर कार्यरत असतो. त्या व्यक्तीने जर आपल्या गावच्या समस्यांकडे लक्ष दिले तर गावचा चेहरा मोहरा बदलू शकतो. म्हणून मी गेल्या दोन वर्षांपासून माझा गाव माझी जबाबदारी हा उपक्रम राबवत आहे गावातच नाही तर तालुक्यातून कुणीही माझ्याकडे काम घेऊन आले तर मी ते करण्याचा प्रयत्न करत असतो.
  • अध्यात्म व प्रशासनामुळे समाज योग्य दिशेने – बोधले
  • या व्यासपीठावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, पत्रकार उपस्थित आहेत आणि प्रत्येक जण आपआपली समाजाप्रती असलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत त्यामुळे आजच्या आधुनिक युगात सुध्दा समाजाचा गाढा योग्य दिशेने आहे. पोलीस आणि अध्यात्म यांनी एकत्रित काम केले तर भरकटत चाललेली तरूण पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते असा आशावाद ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी व्यक्त केला.
  • गावातील तंटे गावातच मिटवा – अतुल कुलकर्णी
  • सध्याचा काळ एकमेकांना सोबत घेऊन प्रगती करण्याचा आहे त्यामुळे एकमेकांत भांडणे करू नका आणि आणि जरी झाले तर ते गावातच मिटवा म्हणजे त्यामुळे एकमेकात द्वेष रहाणार नाही. वृक्षारोपण प्रत्येकाने प्रत्येक वर्षी केले पाहिजे आणि ते वृक्ष जोपासले पण पाहीजे. आता प्रत्येकाने सेंद्रिय शेतीकडे वळले पाहीजे यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे मत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यांनी व्यक्त केले.
error: Content is protected !!