कळंब – कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंबचे मुख्य बाजार आवारातील विविध रस्ते बाजार समिती स्थापने पासून पक्के रस्ते न मिळाल्याने बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. मागील २ वर्षापासून कार्यरत झालेल्या संचालक मंडळाने बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेण्याचा ध्यास घेतला असून बाजार समितीचे सभापती शिवाजी दिगांबर कापसे व उपसभापती श्रीधर गंगाधर भवर यांनी प्रथम बाजार समितीच्या पायाभूत सुविधांवर भर दिला असून बाजार आवारातील रस्ते सुधारण्या करीता ठराव पारीत करून वरीष्ठ कार्यालयाच्या सर्व परवाणग्या घेवून बाजार समिती स्थापनेपासून पहिल्यांदाच ३.५ कोटी रू.ची विकास कामे,रस्ते बांधकाम व पावसाळी गटार बांधकाम करण्याचे कामकाज चालू आहेत.न्यायालयीन लढाई लढून संचालक मंडळाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या रस्त्यांच्या कामांची स्थगिती उठवली आहे.निविदेतील सर्व बाबी योग्य रितीने चालू आहेत का हे पाहण्यासाठी बाजार समितीतील चालू असलेल्या या विकास कामांना दि.३ जून २०२६ रोजी सहाय्यक निबंधक बालाजी सावतर यांनी अचानक भेट देवून चालू असलेल्या विकास कामाची पाहणी करून चालू असलेल्या बांधकामाच्या कामकाजा समाधान व्यक्त केले. बाजार समितीला उपबाजार पेढेत गाळे उभारणी करीता आवश्यक असणारी परवानगी ही मिळाल्या बाबत त्यांनी सुचविले बाजार समितीचे कामकाज हे कायद्यानुसार होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे व सर्व संचालक मंडळाचे कामकाज समाधान कारक असले बाबत ही मत व्यक्त केले.पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिल्या बाबत सभापती यांनी सावतर यांचा यथोचीत सत्कार केला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड