खामसवाडी – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील साठे चौक येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे विचार मंच या फलकाची स्थापना करण्यात येऊन या फलकाचे उद्घाटन दि.५ जुन २०२५ रोजी गावचे ज्येष्ठ पत्रकार सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील,संतोष बाकले यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात येऊन उद्घाटन करण्यात आले. तर संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र पाटोळे व मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या हस्ते पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शाखा अध्यक्ष सचिन पाटोळे,महावीर पाटोळे, संजय पाटोळे, संजय कोळी, भीमराव शिंदे,सावता माळी, बाळासाहेब पाटोळे, धनराज पाटोळे, महादेव कसबे,सुरेश पाटोळे, जगदीश पाटोळे कैलास लोंढे, अमोल सोनटक्के,बबन शिंदे यांच्या सह ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार हनुमंत भाऊ पाटुळे यांनी मानले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी