कळंब – साईलक्ष अभ्यासिका, कळंब यांचा आणखी एक विद्यार्थी यशाच्या शिखरावर – अभिजीत दिलीप तेलंग यांची पुणे SRPF पोलीस पदासाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉ.शुभांगी नाकाडे यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात साईलक्ष अकॅडमीचे संचालक हनुमंत पुरी, गिरी मॅडम,इतर सहशिक्षकवर्ग, तसेच अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.यावेळी उपस्थितांनी अभिजीतच्या यशाची स्तुती करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. साईलक्ष अभ्यासिकेचा हा यशाचा आलेख विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचेच प्रतीक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. “अभिजीतने आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार संचालक हनुमंत पुरी यांनी यावेळी काढले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात